16 महाजनपदे 16 Mahajanpadas In Marathi मगध (दक्षिण बिहार) राजधानी गिरीव्रज/राजगृह प्रसिद्ध राजे – बिंबिसार, अजातशत्रु, शिशुनाग बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग. राजगृह(राजगीर) ही राजधानी. पाच टेकड्यांनी वेढलेले असल्यामुळे गिरीव्रज हे शत्रूसाठी दुर्गम होते. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता. बिंबिसार राजा गौतम बुद्धांचा समकालीन होता. बौद्ध धर्माची पहिली परिषद अजातशत्रुने राजगृह या ठिकाणी भरवली होती. शिशुनाग याने अवंती, कोसल व वत्स ही राज्ये मगधला जोडली. अंग (चंपा-पूर्व बिहार) राजधानी चंपा अंग हे सागरी व्यापाराच्या केंद्रपैकी एक होते. बिंबिसारने अंग महाजनपदाचा पराभव करून मगध साम्राज्यात विलीन केले. वृज्जी/वज्जी (उत्तर बिहार) राजधानी वैशाली वृज्जी हा आठ कुळांचा संघ(महाअठ्ठकुल). विदेह, लिच्छवी, वज्जी, शाक्य, ज्ञातृक इ. कुळांचा समावेश. एकपण्ण जातककथेतील वर्णनानुसार वृज्जी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती तीन कोट बांधलेले होते. तसेच नगराला तीन प्रवेशद्...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.