भाषा आणि भाषण यामधील भेद 1) भाषा एक व्यवस्था : आधुनिक भाषाविज्ञानाचा जनक सोस्यूर याने भाषेच्या स्वरूपाचे वर्णन दोन पातळ्यांवर केले. त्याच्यामध्ये भाषा ही एक ध्वनिरूप व अक्षररूप चिन्हांची व्यवस्था असते. यालाच त्याने 'भाषिक व्यवस्था' अशी संज्ञा वापरली आहे. तर या भाषेचा प्रत्यक्ष व्यवहारातील वापर यास त्याने 'भाषिक वर्तन' किंवा 'भाषिक उच्चारण' अशी संज्ञा वापरली आहे. या दोन संज्ञांमधूनच भाषा आणि भाषण यांचे स्वरूप स्पष्ट करता येते. भाषेच्या अमूर्त स्वरूपाला त्याने 'लांग' असे म्हटले आहे. या 'लांग' संकल्पनेस कोणतेही अस्तित्व नसते. भाषाही एक अव्यक्त स्वरूपाची व्यवस्था असते असे त्याचे मत होते. यालाच त्याने भाषा किंवा भाषिक व्यवस्था असे म्हटले आहे. या व्यवस्थेला सामाजिक संदर्भ असतात असे मत त्याने मांडले आहे; परंतु सामाजिक संदर्भापेक्षा भाषिक चिन्हांना किंवा संरचनेला त्याने अधिक महत्त्व दिले आहे. भाषा अभ्यासकांनी भाषा व्यवस्थेचा अभ्यास करावा असे त्याचे मत होते. सोस्यूर कडून प्रेरणा घेऊन नॉम चॉम्स्की याने रचनांतरणाचा सिद्धांत मांडला; परंतु भाषेच्या सामाजिक ...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.