Skip to main content

SET NET PET मराठी paper 2 | अर्वाचीन मराठी साहित्य | Arvachin Marathi Sahitya | अर्वाचीन मराठी वाङ्मय

Arvachin Marathi Sahitya
 
SET NET मराठी 
अर्वाचीन मराठी साहित्य
Arvachin Marathi Sahitya


प्रश्न १. ‘अज्ञातवासी’ या टोपणनावाने लेखन कोणी केले ?

उत्तर >>>   दिनकर गंगाधर केळकर

 


प्रश्न २. इंग्रज कवी सर वॉल्टर स्कॉट ह्याच्या ‘लेडी ऑफ द लेक’ ह्या काव्याच्या आधारे रचिलेले ‘दैवसेनी’ या खंडकाव्याचे रचनाकार कोण?

उत्तर >>>    बजाबा रामचंद्र प्रधान

 


प्रश्न ३. नाट्यछटाकार ‘दिवाकर’ यांचे पूर्ण नाव काय?

उत्तर >>>    शंकर काशिनाथ गर्गे

 


प्रश्न ४. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा ‘सॉनेट’ काव्यप्रकार हा _____ या नावाने मराठीत लोकप्रिय आहे.

उत्तर >>>    सुनीत

 


प्रश्न ५. ‘आधुनिक मराठी काव्याचे जनक’ म्हणून कोणास संबोधले जाते?

उत्तर >>>    केशवसुत(कृष्णाजी केशव दामले)

 


प्रश्न ६. ‘काव्यप्रकाश’ ग्रंथाचा कर्ता कोण?

उत्तर >>>    मम्मट

 


प्रश्न ७. ‘अपौरुषेय वाग्द्मय’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

उत्तर >>>    कमलाबाई देशपांडे

 


प्रश्न ८. ‘सामूहिक नेणीव’ ही संकल्पना कोणी मांडली आहे?

उत्तर >>>    कार्ल युंग

 


प्रश्न ९. ‘कुसुमांजली’ काव्यसंग्रहाचे रचेते कोण?

उत्तर >>>    विष्णू मोरेश्वर महाजनी

 


प्रश्न १०. ‘धनुर्धारी’ टोपणनावाने लेखन कोणी केले?

उत्तर >>>    रा.वि. टिकेकर

 


प्रश्न ११. ‘काव्यस्य आत्मा ध्वनी:|’ हा विचार कोणी सांगितला आहे?

उत्तर >>>    आनंदवर्धन



प्रश्न १२. मराठीतील मानले जाणारे पहिले स्वतंत्र ऐतिहासिक नाटक ‘थोरले माधवराव पेशवे(1861)’ कोणी लिहिले आहे?

उत्तर >>>    वि.ज. किर्तने(विनायक जनार्दन किर्तने)

 


प्रश्न १३. ‘बाळकराम’ या टोपणनावाने विनोदीलेखन कोणी केले ?

उत्तर >>>    राम गणेश गडकरी



प्रश्न १४. 1851 मध्ये प्रसिद्ध झालेले मराठीतील पहिले भाषांतरीत नाटक म्हणून कोणते नाटक मानले जाते?

उत्तर >>>    प्रबोध चंद्रोदय



प्रश्न १५. छंदशास्त्रावरील ‘वृत्तावतंस’ व ‘वृत्त मुक्तावली’ ग्रंथकार ______ ?

उत्तर >>>   निरंजनमाधव

 


प्रश्न १६. ‘दुर्गा’, ‘विक्रमोर्वशीय’, ‘मृच्छकटिक’, ‘झुंझारराव’, ‘संगीत शारदा’ नाटककार कोण?

उत्तर >>>    गोविंद बल्लाळ देवल

 


प्रश्न १७. ‘मराठी नवकवितेचे जनक’ म्हणून कोण ओळखले जाते?

उत्तर >>>    बा.सी.मर्ढेकर(बाळ सिताराम मर्ढेकर)

 


प्रश्न १८.भिन्न भिन्न वृत्तांमधील ‘ज्ञानेश्वरविजय’ आणि ‘चिदबोध रामायण’ या ग्रंथांची रचना कोणी केली आहे?

उत्तर >>>    निरंजनमाधव

 


प्रश्न १९. ‘रसगंगाधर’ ग्रंथाचा कर्ता कोण?

उत्तर >>>    जगन्नाथ



प्रश्न २०. काव्यशास्त्राचे जुने नाव काय?

उत्तर >>>    अलंकारशास्त्र

 


प्रश्न २१. ‘तन्मयानंद बोध’, ‘विचारचंद्रिका’, ‘चिन्मयानंद बोध’ रचनाकार कोण?

उत्तर >>>    कृष्णदयार्णव

 


प्रश्न २२. ‘वाक्यं रसात्मकं काव्यम् |’ असे काव्य लक्षण कोणी सांगितले?

उत्तर >>>    विश्वनाथ

 


प्रश्न २३. भरतमुनींनी नाट्यशास्त्रात किती रसांचा उल्लेख केला आहे?

उत्तर >>>    आठ

 


पुढे >>>>>>>               <<<<<<< मागे

 

 

 

 


SET NET PET मराठी


Comments

Popular posts from this blog

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

  मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
```html
```