Skip to main content

चालू घडामोडी / Current Affairs marathi 12

प्रश्न 1. संशोधकांना कोणत्या राज्यात 'गार्सिनिया कुसुमाई' नावाच्या झाडाची एक नवीन प्रजाती सापडली आहे , ज्यामुळे या प्रदेशातील फुलांची जैवविविधता समृद्ध झाली आहे ?(#2025)

उत्तर➣ आसाम

*** Notes -

गार्सिनिया कुसुमा ही गार्सिनिया वंशातील एक नवीन ओळखली जाणारी प्रजाती आहे , ज्याला स्थानिक भाषेत आसामीमध्ये 'थोइकोरा' म्हणून ओळखले जाते.

गार्सिनिया कुसुमा हे एक डायओसियस सदाहरित झाड आहे , जे १८ मीटर पर्यंत वाढते, फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत फुले येतात आणि मे ते जून पर्यंत फळ देतात.

प्रश्न 2. 4 थ्या 'वर्ल्ड फूड इंडिया 2025' चे आयोजन कोठे करण्यात आले होते ? (#2025)

उत्तर➣ नवी दिल्ली

*** Notes -

नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे वर्ल्ड फूड इंडिया (World Food India) 2025 च्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, अन्न प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आणि भारताच्या पाककृती समृद्धतेचे प्रदर्शन करण्यासाठी 'अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालया'द्वारे ह्या शिखर परिषदेचे आयोजन केले गेले. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी, न्यूझीलंड आणि सौदी अरेबिया भागीदार देश असतील, तर जपान, युएई, व्हिएतनाम आणि रशिया हे प्रमुख देश म्हणून समाविष्ट असतील.

भारताला जागतिक अन्न केंद्र बनवणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (MoFPI) संकल्पित केलेला WFI हा भारतातील प्रमुख अन्न प्रक्रिया कार्यक्रम आहे.
2017 - प्रथम आवृत्तीनंतर,
2023 - दुसरी आवृत्ती,
2024 - तिसरी आवृत्ती.

प्रश्न 3. भारतीय नौदलाने ऑक्टोबर 2025 मध्ये 'नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम' येथे त्यांचे दुसरे 'पाणबुडीविरोधी युद्धनौका' (ASW-SWC) त्यांच्या ताफ्यात दाखल केले त्याचे नाव काय ?

उत्तर➣ INS अँड्रोथ (INS Androth)

*** Notes -

(ASW-SWC) - Anti-Submarine Warfare Shallow Water Craft.

या नौदल युद्धनौकेचे नाव लक्षद्वीप बेटांमधील "अँड्रॉट" नावाच्या बेटावरून ठेवण्यात आले आहे.

हे जहाज कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (GRSE) ने बनवले आहे.

प्रश्न 4. हैदराबादस्थित ___________ ज ही देशांतर्गत निर्मित उपग्रह वापरून उपग्रह संप्रेषण (सॅटकॉम) सेवा देणारी पहिली खाजगी भारतीय कंपनी बनणार आहे.

उत्तर➣ अनंत टेक्नॉलॉजीज

प्रश्न 5. पंतप्रधान मोदींना '___________ शहराची प्रतीकात्मक चावी' देऊन सन्मानित करण्यात आले. ? (#2025)

उत्तर➣ ब्यूनस आयर्स

*** Notes -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्जेंटिनामध्ये 'ब्यूनस आयर्स शहराची किल्ली' हा विशेष सन्मान मिळाला.

शहराचे मुख्य अधिकारी जॉर्ज मॅक्री यांनी मोदींच्या दोन दिवसांच्या भेटीदरम्यान त्यांना ही प्रतीकात्मक भेट दिली. ही किल्ली दोन्ही देशांमधील मैत्री आणि विश्वासाचे प्रतिनिधित्व करते.

प्रश्न 6. 'जेनिफर गियरलिंग्स-सायमन्स' यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी निवड झाली आहे ? (#2025)

उत्तर➣ सुरीनाम

*** Notes -

सुरीनाम - दक्षिण अमेरिकेतील एक देश

प्रश्न 7. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 57 वर्षानंतर प्रथमच कोणत्या देशाचा द्विपक्षीय दौरा केला आहे ?

उत्तर➣ अर्जेंटिना.

*** Notes -

57 वर्षांत भारतीय पंतप्रधानांचा दक्षिण अमेरिकन देशाला हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे.

पंतप्रधान मोदी यापूर्वी 2018 मध्ये G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अर्जेंटिना येथे गेले होते.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 8. कोणत्या राज्याने 'जन सुरक्षा संतुष्टी अभियान' सुरू केले आहे? ? (#2025)

उत्तर➣ गुजरात

*** Notes -

ही मोहीम 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत चालेल.

सरकारी योजनांपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांना ओळखणे आणि त्यांना लाभ देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

प्रश्न 9. 'FIDE Women’s World Cup 2025' चे आयोजन कोठे करण्यात आले होते ? (#2025)

उत्तर➣ बटुमी, जॉर्जिया.

*** Notes -

5 ते 28 जुलै दरम्यान बटुमी येथे झालेल्या FIDE महिला विश्वचषक 2025 मध्ये 19 वर्षीय दिव्या देशमुख आणि अनुभवी जीएम कोनेरू हम्पी यांच्यात ऐतिहासिक ऑल इंडियन फायनल झाली.

नागपूर येथील दिव्या देशमुख हि FIDE महिला विश्वचषक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला तसेच असे करणारी सर्वात तरुण महिला आहे.

ग्रँडमास्टरचा किताब जिंकणारी दिव्या हि हम्पी कोनेरू, हरिका द्रोणवल्ली, वैशाली रमेशबाबू नंतर चौथी भारतीय महिला ठरली आहे.

जगातील ४४ वी आणि भारताची ८८ वी ग्रँडमास्टर बनली.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 10. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ? (#2025)

उत्तर➣ संजोग गुप्ता (7वे CEO)

प्रश्न 11. कसोटी क्रिकेट मध्ये त्रिशतक करणारा 'वियान मुल्डर' हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ? (#2025)

उत्तर➣ दक्षिण आफ्रिका

*** Notes -

वियान मुल्डर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज आहे. हाशिम आमला याच्यानंतर त्रिशतक करणारा तो दुसरा फलंदाज आहे.

आपल्या 21 व्या कसोटीत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणाऱ्या वियान मुल्डरने झिम्बाब्वेविरुद्ध बुलावायोमध्ये 334 चेंडूत नाबाद 367 धावा केल्या.

प्रश्न 12. 'AFC महिला आशियाई कप 2026' च्या 21व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?

उत्तर➣ ऑस्ट्रेलिया.

प्रश्न 13. जुलै 2025 मध्ये भारत आणि __________ने 'व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (CETA)' वर स्वाक्षरी केली, जो दोन्ही देशांमधील वस्तू आणि सेवांमध्ये प्रवेश वाढवण्याच्या उद्देशाने एक व्यापक मुक्त व्यापार करार आहे.? (#2025)

उत्तर➣ युनायटेड किंग्डम

*** Notes -

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि ब्रिटनचे पंतप्रधान ब्रिटिश किर स्टार्मर (British Kir Starmer) यांच्यात लंडनमध्ये झालेल्या चर्चेनंतर भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 14. जुलै 2025, 'मॉर्गन स्टॅन्ले'च्या संशोधन अहवालानुसार सध्या महाराष्ट्र राज्याचा जीडीपी ___________ अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे, जो भारतातील राज्यांमध्ये सर्वाधिक आहे, तसेच सध्यस्थितीत जगातील 28व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या सिंगापूरच्या जीडीपी इतका आहे.

उत्तर➣ 536 अब्ज

प्रश्न 15. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 27 फेब्रुवारी 2025 रोजी 'कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्रा'चे उद्घाटन कोठे करण्यात आले ? (#2025)

उत्तर➣ जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU),दिल्ली.

प्रश्न 16. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते 24 जुलै, 2025 रोजी नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवन येथे आयोजित कार्यक्रमात कितवे ‘राष्ट्रीय सहकार धोरण 2025’ जाहीर करण्यात आले ?

उत्तर➣ दुसरे

*** Notes -

वर्ष 2002 मध्ये देशाचे पहिले राष्ट्रीय सहकार धोरण जारी करण्यात आले होते.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 17. 'भारतीय तटरक्षक दला (ICG)' साठी डिझाइन केलेल्या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे (PCV) नाव काय आहे ? (#2025)

उत्तर➣ समुद्र प्रचेत

*** Notes -

गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रमाने भारतीय तटरक्षक दल (ICG) साठी डिझाइन केलेल्या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे (PCV), 23 जुलै, 2025 रोजी, गोव्‍यातील वास्को-द-गामा येथील शिपयार्डमध्ये जलावतरण केले.

समुद्र प्रचेत नावाचे हे दोन प्रदूषण नियंत्रण जहाजांच्या मालिकेतील दुसरे जहाज आहे.
समुद्र प्रताप (यार्ड 1267) या पहिल्या जहाजाचे 29 ऑगस्ट, 2024 रोजी अनावरण करण्यात आले होते.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 18. जुलै 2025 मध्ये 'विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात (IRDAI)' चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#2025)

उत्तर➣ अजय सेठ

प्रश्न 19. कोणत्या देशाने जगातील पहिले 'पारंपारिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय (TKDL)' सुरु केले आहे ? (#2025)

उत्तर➣ भारत

*** Notes -

AI साधनांनी समर्थित हे डिजिटल प्लॅटफॉर्म भारताच्या प्राचीन औषध प्रणालींचे जतन आणि विकास करण्यास मदत करते.

हे अशा प्रकारचे पहिलेच ऑनलाइन व्यासपीठ आहे जे आयुर्वेद, युनानी, सिद्ध, सोवा रिग्पा आणि होमिओपॅथी सारख्या प्रणालींमधून प्राचीन ज्ञान गोळा करते आणि जतन करते.

प्रश्न 20. 'Talisman Sabre 2025' कशाशी संबंधित आहे ?

उत्तर➣ द्विपक्षीय लष्करी सराव

*** Notes -

आवृत्ती 11वी.

भारत पहिल्यांदाच सहभागी होत आहे.

हा ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील सर्वात मोठा द्विपक्षीय लष्करी सराव आहे , ज्यामध्ये बहुराष्ट्रीय सहभाग आहे

ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केलेला सर्वात मोठा आणि सर्वात अत्याधुनिक युद्ध सराव आहे. 2005 मध्ये सुरू झालेला हा सराव आणि दर दोन वर्षांनी आयोजित होतो.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रमुख लष्करी सराव
ऑसइंडेक्स(AUSINDEX) (नौदल), पिच ब्लॅक (वायुदल), ऑस्ट्राहिंड (लष्करी) .

भारत-अमेरिका प्रमुख लष्करी सराव
युद्ध अभ्यास (लष्करी) , टायगर ट्रायंफ , कोप इंडिया (वायुदल) आणि वज्र प्रहार .

प्रश्न 21. दरवर्षी 'जागतिक युवा कौशल्य दिन' कधी साजरा करण्यात येतो ?(#2025)

उत्तर➣ 15 जुलै

*** Notes -

Theme 2025- Focuses on Youth Empowerment Through AI and Digital Skills.

2014 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला, ज्यामुळे तरुणांना रोजगार, चांगले काम आणि उद्योजकतेसाठी कौशल्ये प्रदान करण्याचे धोरणात्मक महत्त्व साजरे केले गेले.

प्रश्न 22. जून 2025 मध्ये भारतीय संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला किती वर्षे पूर्ण झाली ?

उत्तर➣ 75 वर्षे

*** Notes -

अंदाज समिती ही लोकसभेच्या प्रमुख समित्यांपैकी एक असून तिची स्थापना 1950 मध्ये झाली होती.

ही समिती सरकारच्या विविध विभागांच्या खर्चाचा आढावा घेते, निधीच्या योग्य वापरावर लक्ष ठेवते आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी शिफारसी करते. संसदीय उत्तरदायित्व आणि पारदर्शकता यामध्ये अंदाज समितीचा मोलाचा वाटा राहिला आहे.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 23. कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावणारा 5 वा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ? (#2025)

उत्तर➣ शुभमन गिल 147 धावा वि. इंग्लंड (हेडिंग्ले, लीड्स)

*** Notes -

विजय हजारे - 164 धावा, विरुद्ध इंग्लंड, 1951 दिल्ली

सुनील गावस्कर - 116 धावा, विरुद्ध न्यूझीलंड, 1976 ऑकलँड

दिलीप वेंगसरकर - 102 धावा, विरुद्ध वेस्ट इंडिज, 1987 दिल्ली

विराट कोहली - 115 आणि 141 धावा, विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2014 ऍडलेड

 

 

 



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

  मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
```html
```