Skip to main content

MPSC Polity questions in Marathi 6 | भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच 6 |

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग ६
MPSC Indian Polity MCQ In Marathi



प्रश्न १. कोणत्या घटनादुरूस्तीनुसार 'राष्ट्रीय अनुसूचित जाती' व ‘राष्ट्रीय अनुसूचित जमाती’ असे दोन स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात आले ?

अ) 89 वी

ब) 44 वी

क) 91 वी

ड) 97 वी

  • अ) 89 वी




  • प्रश्न २ . योग्य विधान/विधाने ओळखा.

     1) भाग 8 मधील कलम 239 ते कलम 241 हे संघराज्य प्रदेशांशी संबंधित आहेत.

     2) संघराज्य प्रदेशाचा प्रशासक हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी असतो व तो राज्यपालाप्रमाणे राज्यप्रमुख नसतो.


    अ) फक्त 1 बरोबर

    ब) फक्त 2 बरोबर

    क) दोन्ही योग्य

    ड) दोन्ही अयोग्य

  • क) दोन्ही योग्य




  • प्रश्न ३ . ______ हा संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो.

    अ) मुख्यमंत्री

    ब) राज्यपाल

    क) राष्ट्रपती

    ड) राज्याचा महाधिवक्ता

  • ब) राज्यपाल




  • प्रश्न ४. विधानपरिषदेत किमान सदस्य संख्या _____ इतकी असते.

    अ) 40

    ब) 60

    क) 78

    ड) 48

  • अ) 40




  • प्रश्न ५. भारताच्या निवडणूक आयुक्तांना वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहता येते ?

    अ) 65 वर्षे

    ब) 60 वर्षे

    क) 62 वर्षे

    ड) 58 वर्षे

  • अ) 65 वर्षे




  • प्रश्न ६. संसद राज्यातील विधान परिषद _______ च्या शिफारशीवरून रद्द करू शकते. (2016)

    अ) राज्य विधानसभा

    ब) राष्ट्रपती

    क) राज्यपाल

    ड) राज्य मंत्रीमंडळ

  • अ) राज्य विधानसभा




  • प्रश्न ७. खालील तरतुदींपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे ?

    अ) भाषा

    ब) घटकराज्ये

    क) राज्यसभेतील जागांची  वाटणी

    ड) केंद्र, राज्य व समवर्ती सूची

  • ड) केंद्र, राज्य व समवर्ती सूची




  • प्रश्न ८. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे  _____  होय.

    अ) राज्य विधीमंडळ

    ब) कार्यकारी मंडळ

    क) न्याय पालिका

    ड) संसद

  • ड) संसद




  • प्रश्न ९. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणास संबोधून त्यांच्या पदाचा लिखित राजीनामा देऊ शकतात.

    अ) लोकसभा सभापती

    ब) राष्ट्रपती

    क) पंतप्रधान 

    ड) केंद्रीय मंत्रीमडळ

  • ब) राष्ट्रपती




  • प्रश्न १०. _______ देशाच्या राज्यघटनेवरून ‘समवर्ती सूची’ स्विकारली आहे ?

    अ) ऑस्ट्रेलिया

    ब) अमेरिका

    क) ब्रिटिश

    ड) भारत सरकार कायदा, 1935

  • अ) ऑस्ट्रेलिया





  • प्रश्न ११. अचूक विधान/विधाने ओळखा.

      1) संसदेत तारांकित प्रश्नांना तोंडी उत्तर अपेक्षित असते.

      2) तर या उलट आतारांकित प्रश्नांना लेखी उत्तर द्यावे लागते .

    अ) फक्त 1 बरोबर

    ब) फक्त 2 बरोबर

    क) दोन्ही योग्य

    ड) दोन्ही अयोग्य

  • क) दोन्ही योग्य




  • प्रश्न १२. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी  ______  हे असतात ?

    अ) मुख्यमंत्री

    ब) राज्यपाल

    क) विधानसभा अध्यक्ष

    ड) राज्याचे सचिव

  • अ) मुख्यमंत्री




  • प्रश्न १३. राज्यघटनेतील भाग ______ मध्ये संसदेचा घटनादुरूस्तीचा अधिकार व घटनादुरुस्तीची प्रक्रिया देण्यात आली आहे .

    अ) भाग 9 ए

    ब) भाग 18

    क) भाग 12

    ड) भाग 20

  • ड) भाग 20




  • प्रश्न १४.  _______  हा संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतो.

    अ) लोकसभा सभापती

    ब) पंतप्रधान

    क) राज्यसभा अध्यक्ष

    ड) विरोधी पक्षनेता

  • अ) लोकसभा सभापती




  • प्रश्न १५. भारताच्या संचित निधीत पुढील खर्चांचा समावेश होतो.

     १) लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते

     २) संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांचे वेतन व भत्ते

     ३) राज्यसभेचे सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते


    अ) १ आणि २ फक्त

    ब) २ आणि ३ फक्त

    क) १ आणि ३ फक्त

    ड) वरिल सर्व 

  • ड) वरिल सर्व




  • प्रश्न १६. भारताच्या महान्यायवादी बाबत खालील विधाने विचारात घ्या :

      अ) ते पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात.

      ब) ते राष्ट्रपतीची मर्जी असे पर्यंत पदावर राहतात

      क) ते संसद सदस्यांचे विशेषाधिकार मिळण्यास पात्र असतात.

      ड) ते शासनासाठी पूर्णवेळ सल्लागार किंवा अथवा शासकीय सेवकही नाहीत.


    अ) विधाने अ, ब बरोबर आहेत

    ब) विधाने ब, क, ड बरोबर आहेत

    क) विधाने ब, क बरोबर आहेत

    ड) विधाने अ, ब, क, ड बरोबर आहेत

  • ब) विधाने ब, क, ड बरोबर आहेत





  • प्रश्न १७. कितव्या घटनादुरुस्तीनुसार, राज्यपाल अ‍ॅग्लो इंडियन समूहासाठी एका सदस्याची नियुक्ती विधान सभेत आवश्यक असल्यास करू शकतात ?

    अ) 21 वी घटनादुरुस्ती

    ब) 22 वी घटनादुरुस्ती

    क) 23 वी घटनादुरुस्ती

    ड) 24 वी घटनादुरुस्ती 

  • क) 23 वी घटनादुरुस्ती




  • प्रश्न १८. भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट 9 चा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला ?

    अ) पहिली घटनादुरुस्ती

    ब) सातवी घटनादुरुस्ती

    क) बेचाळिसावी घटनादुरुस्ती

    ड) यापैकी नाही

  • अ) पहिली घटनादुरुस्ती




  • प्रश्न १९. योग्य जोड्या लावा (राज्य व स्थापना वर्ष)

    A) नागालँड                1) 2000

    B) हिमाचल प्रदेश        2) 1963

    C) गोवा                    3) 1971

    D) झारखंड                4) 1987


    अ) A - 2, B - 3, C - 4, D - 1

    ब) A - 3, B - 1, C - 2, D - 1

    क) A - 4, B - 2, C - 3, D - 1

    ड) A - 2, B - 4, C - 3, D - 1

  • ड) A - 2, B - 3, C - 4, D - 1




  • प्रश्न २०.  योग्य जोड्या लावा (कलम - तरतूद)

    A) कलम 343         1) संघराज्याची अधिकृत भाषा

    B) कलम 315         2) संघ व राज्य लोकसेवा आयोग

    C) कलम 280        3) वित्त आयोग

    D) कलम 148        4) नियंत्रक व महालेखापरीक्षक


    अ) A - 1, B - 2, C - 4, D - 3

    ब) A - 2, B - 1, C - 3, D - 4

    क) A - 1, B - 2, C - 3, D - 4

    ड) A - 4, B - 3, C - 2, D - 1

  • क) A - 1, B - 2, C - 3, D - 4
  •  

    4 5 6 7 8

     

     

     

     

     

     





    mpsc polity notes || mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || Indian Polity MCQ Quiz in marathi || mpsc polity pyq || mpsc polity notes in marathi || mpsc polity questions in marathi || mpsc polity mcq in marathi 

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```