Skip to main content

MH SET Exam Marathi || NET Exam marathi Paper 2 भाग 6

सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 6
SET NET PET Marathi Paper 2



प्रश्न १. रणजित देसाई यांनी ______ या कादंबरीत बेरड या भटक्या जमातीचे चित्रण केले आहे?

अ) बारी

ब) बळी

क) माकडीचा माळ

ड) यापैकी नाही

  • अ) बारी 
  • बळी(कादंबरी) - विभावरी शिरूरकर 
  • माकडीचा माळ(कादंबरी) - अण्णाभाऊ साठे



  • प्रश्न २ . पुढील आत्मकथनांनपैकी लक्ष्मण गायकवाड यांचे आत्मकथन कोणते ?

    अ) धूळपाटी

    ब) उचल्या

    क) भंगार

    ड) बारामाशी

  • ब) उचल्या 
  • ‘उचल्या’ आत्मकथनास साहित्य अकादमी पुरस्कार (1988)
  • धूळपाटी - श्रीरंग तलवारे
  • भंगार - अशोक जाधव 
  • बारामाशी - शरणकुमार लिंबाळे



  • प्रश्न ३ . खालीलपैकी कोणती कादंबरी श्री.ना.पेंडसे यांची नाही ?

    अ) एल्गार

    ब) हद्दपार

    क) भावीण

    ड) गारंभीचा बापू

  • क) भावीण 
  • भावीण - बा.भ. बोरकर




  • प्रश्न ४. ‘चंद्र नभीचा ढळला’ हे नाटक कोणाचे ?

    अ) बाळ कोल्हटकर

    ब) श्री.ना. पेंडसे

    क) पुरुषोत्तम दारव्हेकर

    ड) जयवंत दळवी

  • क) पुरुषोत्तम दारव्हेकर 
  • अल्बर्ट कामुस ह्या फ्रेंच नाटककाराच्या ‘कॅलीगुला’ या नाटकाचे ‘चंद्र नभीचा ढळला’ हे रूपांतर पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी केल होत. ( कॅलीगुला ह्या रोमन सम्राटाची व्यक्तिरेखा ह्या नाटकात आहे. )




  • प्रश्न ५. ‘सावता सागर, प्रेमाचा आगर’ असा सावता माळींचा गौरव कोणी केला ?

    अ) संत बहिणाबाई

    ब) संत एकनाथ

    क) संत जनाबाई

    ड) संत नामदेव

  • ड) संत नामदेव




  • प्रश्न ६. ‘The Linguistic survey of India’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

    अ) जॉर्ज ग्रियर्सन

    ब) विल्यम कॅरे

    क) सोस्यूर

    ड) हॉकेट

  • अ) जॉर्ज ग्रियर्सन





  • प्रश्न ७. ‘धारानृत्य (1950)’, ‘जिप्सी (1953)’, ‘मीरा (1965)’, ‘सलाम (1978)’, ‘गझल (1981)’  कविता संग्रह कोणाचे ?

    अ) इंदिरा संत

    ब) मंगेश पाडगावकर

    क) मर्ढेकर

    ड) विं. दा. करंदीकर

  • ब) मंगेश पाडगावकर 
  • ‘सलाम’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार(1980)




  • प्रश्न ८. डॉ. सू. मं. कत्रे यांनी ‘द फॉर्मेशन ऑफ कोकणी’ या भाषा ग्रंथात कोकणीच्या प्रमुख _______ बोलींचे प्रकार सांगितले आहेत.

    अ) सात

    ब) तीन

    क) सहा

    ड) पाच

  • क) सहा




  • प्रश्न ९. सुरेश द्वादशीवार यांच्या _____ कादंबरी मध्ये माडिया गोंड ह्या जमातीच्या जीवनाचे चित्रण आहे ?

    अ) रोहिणी

    ब) झेलझपाट

    क) हाकुमी

    ड) थॅंक्यू मिस्टर ग्लाड

  • क) हाकुमी 
  • रोहिणी - केशव केळकर 
  • झेलझपाट - मधुकर वाकोडे 
  • थॅंक्यू मिस्टर ग्लाड - अनिल बर्वे




  • प्रश्न १०. लेखन व्यवहारासाठी कोणत्या भाषेचा वापर केला जातो ?

    अ) प्रमाणभाषा

    ब) बोली भाषा

    क) चिन्हांची भाषा

    ड) यापैकी नाही

  • अ) प्रमाणभाषा




  • प्रश्न ११. भागवत धर्माचा विस्तार करणारे संतकवी कोण ?

    अ) संत बहिणाबाई

    ब) संत एकनाथ

    क) संत जनाबाई

    ड) संत नामदेव

  • ड) संत नामदेव




  • प्रश्न १२. ‘बाई मी भोळी’, ‘विंचू’, ‘थट्टा’ ही प्रसिद्ध व जनमाणसात रुजलेली भारुडे कोणाची ?

    अ) संत नामदेव

    ब) संत एकनाथ

    क) सावता माळी

    ड) संत चोखामेळा

  • ब) संत एकनाथ




  • प्रश्न १३. पगार, पाव, पुरावा, तुरुंग हे कोणत्या भाषेतील मूळ शब्द आहेत ?

    अ) कानडी

    ब) पोर्तुगिज

    क) फार्सी

    ड) यापैकी नाही

  • ब) पोर्तुगिज




  • प्रश्न १४. “गोणाईने नवस केला I देवा पुत्र देई मला I ऐसा पुत्र देई भक्त I ज्याला आवडे पंढरीनाथ II” अभंग कोणाचा ?

    अ) संत नामदेव

    ब) संत गोरा कुंभार

    क) संत जनाबाई

    ड) संत बहिणाबाई

  • क) संत जनाबाई




  • प्रश्न १५. “उपजता कर्ममेळा | वाचे विठ्ठल सावळा | विठ्ठल नामाचा गजर | वेगे धावे रुक्मिणीवर |” अभंग रचनाकार कोण ?

    अ) बहिणाबाई

    ब) जनाबाई

    क) वेणाबाई

    ड) सोयराबाई

  • ड) सोयराबाई




  • प्रश्न १६. लेकुरे उदंड झाली, मत्स्यगंधा, देवांचे मनोराज्य, दोन ध्रुवावर दोघे आपण, तुझा तू वाढवी राजा नाटककार कोण ?

    अ) नाना जोग

    ब) पू.ल. देशपांडे

    क) वि.वा. शिरवाडकर

    ड) वसंत कानेटकर

  • ड) वसंत कानेटकर




  • प्रश्न १७. खालील पर्यायांपैकी कोणते नाटक माधव मनोहर यांचे नाही ?

    अ) आई

    ब) सशाची शिंगे

    क) माणूस नावाचे बेट

    ड) आजोबाच्या मुली

  • क) माणूस नावाचे बेट 
  • माणूस नावाचे बेट - विजय तेंडुलकर




  • प्रश्न १८. तेरुओ, निरगाठी, 'चंद्रिके ग, सारिके ग' कादंबरी लेखक कोण ?

    अ) दुर्गा भागवत

    ब) अरुण साधू

    क) श्याम मनोहर

    ड) गौरी देशपांडे

  • ड) गौरी देशपांडे




  • प्रश्न १९. . स्पर्शाची पालवी हा ललित लेखसंग्रह _______ यांचा होय ?

    अ) गो. वि. करंदीकर

    ब) इरावती कर्वे

    क) अनंत काणेकर

    ड) दुर्गा भागवत

  • अ) गो. वि. करंदीकर




  • प्रश्न २०. “ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा” अभंग रचनाकार कोण ?

    अ) चोखामेळा

    ब) नामदेव

    क) कान्होपात्रा

    ड) बंका

  • अ) चोखामेळा




  • प्रश्न २१ . ऐसा गा मी ब्रम्ह, माझे विद्यापीठ, जाहीरनामा कवितासंग्रह कोणाचे ?

    अ) अरुण कोलटकर

    ब) नारायण सुर्वे

    क) चंद्रकांत खोत

    ड) यापैकी नाही

  • ब) नारायण सुर्वे




  • प्रश्न २२ . ‘मिकी आणि मेमसाहेब’, ‘महानिर्वाण’, ‘महापूर’, ‘बेगम बर्वे’, ‘शनिवार रविवार’ ही _________ यांची नाटके आहेत ?

    अ) रत्नाकर मतकरी

    ब) अच्युत वझे

    क) विद्याधर पुंडलीक

    ड) सतीश आळेकर

  • ड) सतीश आळेकर 
  • अच्युत वझे यांची काही नाटक - ‘एक होता मधुकर’, ‘षढज’, ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’, ‘सायसाखर’, ‘लागला तर घोडा, नाही तर झेब्रा’, ‘रवी आणी शालू’.




  • प्रश्न २३. अर्थविज्ञानाचा उद्गाता ______ यांनी 1897 मध्ये ‘Semantics’ ही संज्ञा प्रथम वापरली.

    अ) मायकेल ब्रेआल

    ब) सोस्युर

    क) चॉम्स्की

    ड) यापैकी नाही

  • अ) मायकेल ब्रेआल 
  • Semantique या मूळ फ्रेंच शब्दावरून आलेली ही संज्ञा अनेकवचनी आहे.




  • प्रश्न २४. मराठीचा अर्थविचार ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे ?

    अ) डॉ. मिलिंद मालशे

    ब) डॉ. अशोक केळकर

    क) डॉ. अनुराधा पोतदार

    ड) ब्लुमफील्ड

  • क) डॉ. अनुराधा पोतदार




  • प्रश्न २५. मायकेल ब्रेआल यांनी Semantics ही संज्ञा प्रथम वापरली त्यास अर्थविन्यास हा मराठी पर्याय कोणी सुचविला ?

    अ) डॉ. अशोक केळकर

    ब) ना.गो. कालेलकर

    क) चॉम्स्की

    ड) यापैकी नाही

  • अ) डॉ. अशोक केळकर




  • प्रश्न २६. . ‘आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन’ ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे ?

    अ) डॉ. रमेश धोंगडे

    ब) डॉ. अनिल गवळी

    क) डॉ. अशोक केळकर

    ड) डॉ. मिलिंद मालशे

  • ड) डॉ. मिलिंद मालशे

  • प्रश्न २७. ‘अंतर्वर्तुळ - बहिर्वर्तुळ’ सिद्धान्त ______ ह्या भाषाशास्त्रज्ञाने मांडला.

    अ) ब्रेआल

    ब) होर्न्ले

    क) हॉकेट

    ड) पिजिन

  • ब) होर्न्ले




  • प्रश्न २८. खालीलपैकी कोणत्या भाषेचा ‘द्रविडी भाषाकुलात’ समावेश होणार नाही.

    अ) मराठी

    ब) कानडी

    क) तामिळ

    ड) तेलगू

  • अ) मराठी




  • प्रश्न २९. ‘अक्कल’ हा शब्द मराठीने कोणत्या भाषेतून स्वीकारला आहे ?

    अ) अरबी

    ब) कानडी

    क) फारसी

    ड) तुर्की

  • ब) कानडी




  •  

     

     

     


     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```