Skip to main content

SET/NET Paper 1 भाग 1

SET Paper 1 भाग 1

Previous Year Questions............

Share करायला विसरू नका.......................



प्रश्न 1. अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये -------------- चा अंतर्भाव होतो. (SET 2021)

(i) स्मरण      (ii) अभियोग्यता      (iii) मर्मदृष्टी        (iv) सर्जनशीलता

अ) (i) आणि (ii)

ब) (ii) आणि (iii)

क) (i) आणि (iii)

ड) (ii) आणि (iv)

  • क) (i) आणि (iii)







  • प्रश्न 2. मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ ............... हा होय. (SET 2021)

    अ) बालपण

    ब) कुमारावस्था

    क) प्रौढावस्था

    ड) वृद्धत्व

  • ब) कुमारावस्था






  • प्रश्न 3. SWAYAM चा 'ऑनलाईन डिस्कशन फोरम' ................... असतो. (SET 2021)

    अ) शंकासमाधान करण्यासाठी

    ब) स्वयं - मूल्यांकनासाठी

    क) व्हिडीओ लेक्चर्स पाहण्यासाठी

    ड) वाचनसाहित्य डाऊनलोड करण्यासाठी

  • अ) शंकासमाधान करण्यासाठी






  • प्रश्न 4. ................... चा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. (SET 2021)

    अ) डिजिटल तक्ते

    ब) नकाशे

    क) दिग्दर्शन पद्धती

    ड) भूमिकापालन पद्धती

  • क) दिग्दर्शन पद्धती





  • प्रश्न 5. निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे ................. श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. (SET 2021)

    अ) अप्रत्यक्ष

    ब) प्रत्यक्ष

    क) विशेष

    ड) प्रमाणित

  • अ) अप्रत्यक्ष





  • प्रश्न 6. गुणात्मक संशोधनात 'चिंतनशील टिपा'च्या नोंदी करणे यास ................. असे म्हणतात. (SET 2021)

    अ) सांकेतिकीकरण (Coding)

    ब) टिपण काढणे (Memoing)

    क) नि:सांकेतिकीकरण (Decoding)

    ड) सूचना करणे (Instructing)

  • ब) टिपण काढणे (Memoing)






  • प्रश्न 7. संशोधन लेख (Research Paper) .................... वर आधारित असतो. (SET 2021)

    (i) प्राथमिक माहिती (data)    (ii) दुय्यम माहिती      (iii) वर्णनात्मक माहिती

    अ) केवळ (i)

    ब) केवळ (ii)

    क) (i) आणि (ii)

    ड) (ii) आणि (iii)

  • क) (i) आणि (ii)





  • प्रश्न 8. संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्वपूर्ण असतो ? (SET 2021)

    अ) माध्यम

    ब) संदेश

    क) प्रेषक

    ड) त्वरीत प्रत्याभरण

  • ड) त्वरित प्रत्याभरण






  • प्रश्न 9. विमर्शी अध्यापन म्हणजे .............. होय. (SET 2020)

    अ) अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया

    ब) अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया

    क) अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया

    ड) अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया

  • क) अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया






  • प्रश्न 10. शिक्षकाने .............. ओळखून अध्यापन केले पाहिजे. (SET 2020)

    अ) विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती

    ब) विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद

    क) पालकांची आर्थिक स्थिती

    ड) पालकांमधील व्यक्तिभेद

  • ब) विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद






  • प्रश्न 11. अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये ............... चा समावेश होतो. (SET 2020)

    अ) व्हाईट बोर्ड

    ब) स्मार्ट बोर्ड

    क) डिजिटल बोर्ड

    ड) त्रिमितीय प्रतिकृती

  • ड) त्रिमितीय प्रतिकृती






  • प्रश्न 12. शिक्षक विध्यार्थ्यांच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात. याला ........... म्हणतात. (SET 2020)

    अ) नोंदवही तपासणी

    ब) दैनंदिन शेरे

    क) मूल्यमापन

    ड) मूल्यांकन

  • क) मूल्यमापन






  • प्रश्न 13. सॉक्रेटिसने सत्यशोधनाची ............... पद्धती दिली. (SET 2020)

    अ) प्रायोगिक

    ब) निरीक्षण

    क) चिकित्सा

    ड) संवाद

  • ड) संवाद






  • प्रश्न 14. प्रायोगिक संशोधनांचा हेतू ................... हा असतो. (SET 2020)

    अ) चलांमधील संबंध प्रस्तापित करणे

    ब) चलांचे वर्णन करणे

    क) सिद्धांतांच्या उपयोजनाचा अभ्यास करणे

    ड) प्रघात (trend) विश्लेषणाचा अभ्यास करणे

  • क) सिध्दांतांच्या उपयोजनाचा अभ्यास करणे






  • प्रश्न 15. संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना ................ असे म्हणतात. (SET 2020)

    अ) उद्दिष्टे 

    ब) परिमर्यादा

    क) गृहितके

    ड) परिकल्पना

  • ब) परिमर्यादा







  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे





    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```