Skip to main content

SET/NET Marathi Paper 24

 

SET/NET Marathi Paper 24

Share करायला विसरू नका.......................



प्रश्न 1. वि. का. राजवाडे यांनी 'महाराष्ट्राचे सर टॉमस मोर' हे बिरुद कोणास बहाल केले आहे ? (SET 2023)

अ) रामचंद्रपंत अमात्य

ब) म्हाइंभट

क) कृष्णाजी अनंत सभासद

ड) म. फुले

  • क) कृष्णाजी अनंत सभासद







  • प्रश्न 2. 'कचाचे मिथक' कोणत्या साहित्यकृतीत योजले आहे ? (SET 2023)

    अ) कोण म्हणतंय टक्का दिला

    ब) तुही यत्ता कंची

    क) भिजकी वही

    ड) शोभायात्रा

  • अ) कोण म्हणतंय टक्का दिला
  • कोण म्हणतंय टक्का दिला (नाटक) - संजय पवार
  • तुही यत्ता कंची (कविता संग्रह) - नामदेव ढसाळ
  • भिजकी वही (कविता संग्रह) - अरुण कोलटकर
  • शोभायात्रा (नाटक) - शफाअत खान 







  • प्रश्न 3. मानवी मनातील क्रौर्य आणि हिंसा यांचे प्रत्ययकारी दर्शन पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीत आढळते ? (SET 2023)

    अ) गिधाडे

    ब) वळीव

    क) माणूस

    ड) बनगरवाडी

  • अ) गिधाडे
  • गिधाडे (नाटक) - विजय तेंडुलकर
  • वळीव - शंकर पाटील







  • प्रश्न 4. 'आयबू' हि व्यक्तिरेखा कोणत्या साहित्यकृतीत आढळते ? (SET 2023)

    अ) शोभायात्रा

    ब) बनगरवाडी

    क) वळीव

    ड) हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ

  • ब) बनगरवाडी






  • प्रश्न 5. 'मुलगी झाली हो' या पथनाट्याची संहिता कोणी लिहिली आहे ? (SET 2023)

    अ) छाया दातार

    ब) ज्योती म्हापसेकर

    क) मुक्ता मनोहर

    ड) समर खडस

  • ब) ज्योती म्हापसेकर






  • प्रश्न 6. 'आस्वादक समीक्षा पद्धती' चे अस्तित्व कोणी नाकारले आहे ? (SET 2023)

    अ) गंगाधर गाडगीळ

    ब) रा. ग. जाधव

    क) रा. भा. पाटणकर

    ड) के. रं. शिरवाडकर

  • क) रा. भा. पाटणकर (राजाराम भालचंद्र पाटणकर)







  • प्रश्न 7. 'अनेक आवाजीपणा' हि संकल्पना कोणत्या साहित्यप्रकाराच्या संदर्भात योजलेली आहे ? (SET 2023)

    अ) दीर्घकथा

    ब) कादंबरी

    क) नाटक

    ड) दीर्घ कविता

  • ब) कादंबरी






  • प्रश्न 8. गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त सांप्रदायिकांचा वेदग्रंथ मानला जातो. तो पुढील कोणी लिहिला आहे ? (SET 2023)

    अ) सरस्वती गंगाधर

    ब) नृसिंह सरस्वती

    क) निरंजन रघुनाथ

    ड) दासोपंत

  • अ) सरस्वती गंगाधर







  • प्रश्न 9. 'माझ्या गं दारावरनं, कोणा राजाचा हत्ती गेला' या गीतातील लक्ष्यार्थाचे प्रयोजन कोणते ? (SET 2023)

    अ) अंगांगीभाव

    ब) आधाराधेय

    क) अतिनिकटत्व

    ड) कार्यकारणभाव

  • क) अतिनिकटत्व







  • प्रश्न 10. 'लेखनप्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रियेपेक्षा अर्थाच्या गाभ्याशी संलग्न राहून अधिक सूक्ष्मतर शैलीरूपे प्रकट करीत राहते.' हे मत कुणी मांडले आहे ? (SET 2021)

    अ) भालचंद्र नेमाडे

    ब) अशोक केळकर

    क) रमेश धोंगडे

    ड) मिलिंद मालशे

  • अ) भालचंद्र नेमाडे







  • प्रश्न 11. स्वनांची पुढीलपैकी कोणती जोडी घोष - अघोष यातील भेद दर्शवणारी आहे ? (SET 2021)

    अ) /  प् - फ्  /

    ब) /  ट् - त्  /

    क) /  क्  - ग्  /

    ड) /  य्  - व्  /

  • क) /  क् - ग्  /







  • प्रश्न 12. अक्षरसंख्या, अक्षरांचा लगक्रम आणि असल्यास यतिस्थान निश्चित असलेला पद्यरचनाप्रकार पुढीलपैकी कोणता ? (SET 2021)

    अ) अक्षरगणवृत्त

    ब) मात्रावृत्त

    क) छंद

    ड) जाती

  • अ) अक्षरगणवृत्त







  • प्रश्न 13. पुढीलपैकी कोणते नियतकालिक साहित्य महामंडळाच्या घटक संस्थेमार्फत चालविले जाते ? (SET 2021)

    अ) युगवाणी

    ब) विशाखा

    क) अक्षरपेरणी

    ड) मुक्तशब्द

  • अ) युगवाणी







  • प्रश्न 14. पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोनातून पूर्वीपासून वाङमयेतिहास लिहिला जात होता ? (SET 2021)

    अ) स्त्रीवादी

    ब) व्यक्तिकेंद्री

    क) मार्क्सवादी

    ड) विद्रोही

  • ब) व्यक्तिकेंद्री






  • प्रश्न 15. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन पुढीलपैकी कोणाकडून केले जाते ? (SET 2021)

    अ) महाराष्ट्र साहित्य परिषद

    ब) महाराष्ट्र शासन

    क) साहित्य महामंडळ

    ड) स्थानिक आयोजक संस्था







    प्रश्न 16. स्त्रीवादी दृष्टीकोनातून वाङ्मयकृतीचे पुनर्वाचन व पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक ठरते, कारण त्यातून उपलब्ध इतिहासातील घटितांचे अर्थ व त्यांची संगती बदलू शकते ? (SET 2021)

    अ) संपूर्ण विधान बरोबर

    ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

    क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

    ड) संपूर्ण विधान चुकीचे

  • अ) संपूर्ण विधान बरोबर






  • प्रश्न 17. साहित्येतिहासाचे समुचित ज्ञान का उपकारक ठरते ? (SET 2021)

    अ) साहित्याच्या मूल्यमापनासाठी

    ब) साहित्याच्या आकलन - आस्वादनासाठी

    क) साहित्याची निर्मिती प्रक्रिया उमजण्यासाठी

    ड) साहित्यकार व वाचकवर्ग यांच्यातील परस्पर संबंध जाणण्यासाठी

  • ब) साहित्याच्या आकलन - आस्वादनासाठी






  • प्रश्न 18. "महाराष्ट्र जे सर्व राष्ट्रांसि राजे । जयाच्या भये व्यापिले देव लाजे" असे महाराष्ट्र विषयीच्या अभिमानाचे उदगार कोणी काढले आहेत ? (SET 2021)

    अ) रामदास

    ब) वामन पंडीत

    क) रघुनाथ पंडित

    ड) मुक्तेश्वर

  • ड) मुक्तेश्वर






  • प्रश्न 19. नागदेवाचार्यांच्या संमतीने व मार्गदर्शनाने 'लीलाचरित्रा'तील चक्रधरांची वचने निवडून केशिराजांनी सिद्ध केलेला ग्रंथ कोणता ? (SET 2021)

    अ) दृष्टांतपाठ

    ब) सूत्रपाठ

    क) मूर्तिप्रकाश

    ड) पंचवार्षिक

  • ब) सूत्रपाठ






  • प्रश्न 20. आरती ज्ञानराजा ।  महाकैवल्यतेजा । । 

    सेविती साधुसंत ।  मनू वेधला माझा । । 

    हि आरती कोणी लिहिली ? (SET 2021)

    अ) नामदेव

    ब) रामा जनार्दन

    क) विठा रेणुकानंदन

    ड) जनी जनार्दन

  • ब) रामा जनार्दन








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे


     

     

     

     


    SET/NET मराठी 
    ugc net marathi | set exam marathi paper 2 previous year papers | set exam marathi paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam marathi | set exam pattern

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```