अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले. अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती. मंडळाच्या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे , मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई , मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर , विदर्भ साहित्य संघ नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...
Comments
Post a Comment