Skip to main content

SET/NET History 16

SET/NET History 16

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. अन्नाचे उत्पादन करणाऱ्या (शेती) सुरुवातीच्या समूहांचा उदय ________ या कालखंडात बलुचिस्तान आणि विंध्य पर्वतांच्या उत्तर रांगांत झाला.   (SET 2016 P3)

अ) इ. स. पू. 1000 - 500

ब) इ. स. पू. 7000 - 3000

क) इ. स. पू. 3000 - 2000

ड) इ. स. पू. 2000 - 1000

  • ब) इ. स. पू. 7000 - 3000






  • प्रश्न 2. ________ या संशोधकाने कोणत्याही हडप्पा संस्कृतीच्या स्थानाचे उत्खनन केले नाही. (SET 2016 P3)

    अ) राखालसदास बॅनर्जी

    ब) माधो स्वरूप वत्स

    क) दया राम साहनी

    ड) व्हि. गॉर्डन शिल्ड / चाइल्ड

  • ड) व्हि. गॉर्डन शिल्ड / चाइल्ड







  • प्रश्न 3. हडप्पातील मुद्रा या _________ द्रव्यापासून बनवल्या गेल्या.  (SET 2016 P3)

    अ) चाल्सेडोनी

    ब) स्टीटाइट

    क) क्वार्ट्झ

    ड) लेपीस - लाझुली

  • ब) स्टीटाइट







  • प्रश्न 4. आदिपुराण _______ यांनी रचले ?  (SET 2016 P3)

    अ) सोमदेव

    ब) जिनसेन

    क) वराहमिहीर

    ड) अश्वघोष

  • ब) जिनसेन






  • प्रश्न 5. राजाच्या दिनक्रमामध्ये कौटिल्याने रात्रीचे _______ भाग केले. (SET 2016 P3)

    अ) पाच

    ब) सहा

    क) सात

    ड) आठ

  • ड) आठ






  • प्रश्न 6. जातक कथानुसार लोकांकडून कर गोळा करण्याचे काम कोण करत होते ? (SET 2016 P3)

    अ) रज्जूक व दण्डिन

    ब) भागकर व भागदूत

    क) तुंदियस् व अकसीयस्

    ड) पुरोहीत व राजाचार्य

  • क) तुंदियस् व अकसीयस्







  • प्रश्न 7. अशोकाने आपल्या राज्यकाळात कोणत्या अधिकाऱ्याची नव्याने नेमणूक केली ?   (SET 2016 P3)

    अ) प्रादेशिक

    ब) धर्म महामात्र

    क) युक्त

    ड) राजूक

  • ब) धर्म महामात्र






  • प्रश्न 8. पाषाण - कलेचे नमुने ________ या ठिकाणी नाहीत.  (SET 2016 P3)

    अ) मास्की

    ब) भीमबेटका

    क) पिक्लीहाल

    ड) दायमाबाद

  • ड) दायमाबाद







  • प्रश्न 9. खालीलपैकी कोणते भुर्तहरीच्या तीन शतकांचा भाग नाही ?  (SET 2016 P3)

    अ) नीती शतक

    ब) शृंगार शतक

    क) वैराग्य शतक

    ड) आचार शतक

  • ड) आचार शतक






  • प्रश्न 10. शून्यवादाच्या सिद्धांताचे श्रेय कोणाला दिले जाते ?  (SET 2016 P3)

    अ) उपाली

    ब) आनंद

    क) नागार्जुन

    ड) बावरी

  • क) नागार्जुन






  • प्रश्न 11. खालीलपैकी कोणत्या युद्धाने फ्रेंच सत्तेचे भारतातील भवितव्य संपुष्टात आले ?  (SET 2017 P2)

    अ) पहिले कर्नाटक युद्ध

    ब) बक्सरचे युद्ध

    क) प्लासीचे युद्ध

    ड) वांदीवॉशचे युद्ध

  • ड) वांदीवॉशचे युद्ध







  • प्रश्न 12. इ. स. 1856 मध्ये अवध प्रांत ब्रिटिश कंपनीत सामील करण्यात आला, याचे कारण _______ हे होय. (SET 2017 P2)

    अ) कायदेशीर वारसाचा अभाव

    ब) भोंगळ प्रशासन

    क) युद्धात झालेला पराभव

    ड) अलाहाबादचा तह

  • ब) भोंगळ प्रशासन







  • प्रश्न 13. वि. दा. सावरकरांचे कोणते पुस्तक 1908 च्या शेवटी पॅरिसमध्ये प्रकाशित झाले आणि भारतात चोरून पाठवतांना 'रॅन्डम पेपर्स ऑफ द पिकवीक क्लब' या नावाने भारतात आणले गेले ? (SET 2017 P2)

    अ) अ फ्यू वर्ड्स अबाऊट द रेड पॅम्फलेट

    ब) द इंडिअन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स ऑफ 1857

    क) काळेपाणी

    ड) दि अदर साईड ऑफ द मेडल

  • ब) द इंडिअन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स ऑफ 1857






  • प्रश्न 14. खालीलपैकी कोणती जोडी विसंगत आहे ?  (SET 2017 P2)

    अ) सी. आर. रेड्डी - प्रजामित्रमंडळी

    ब) म. ज्योतिबा फुले - सत्यशोधक समाज

    क) आत्माराम पांडुरंग - प्रार्थना समाज

    ड) डॉ. बाबासाहेब आंबेडकर - शेड्युल कास्ट्स फेडरेशन

  • अ) सी. आर. रेड्डी - प्रजामित्रमंडळी






  • प्रश्न 15. म. गांधी यांनी कोणाच्या विनंतीवरून चंपारण या भागाला भेट देण्याचे ठरविले होते ? (SET 2017 P2)

    अ) राजेंद्र प्रसाद

    ब) जे. बी. क्रिपलानी

    क) राजकुमार शुक्ला

    ड) ब्रिज किशोर

  • क) राजकुमार शुक्ला





  • प्रश्न 16. 1784 चा पिटचा भारत कायदा कोणत्या हेतूने प्रेरीत होता ?  (SET 2018 P2)

    अ) इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीवर पार्लमेंटची थोडीबहुत सत्ता आणणे

    ब) ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात कपात करणे

    क) कंपनीच्या व्यापारी हक्कांवर नियंत्रण आणणे

    ड) कंपनीला राजकीय सत्ताविरहीत अशी व्यापारी पेढी बनविणे

  • अ) इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीवर पार्लमेंटची थोडीबहुत सत्ता आणणे





  • प्रश्न 17. ईस्ट इंडिया कंपनीची चहाचा व्यापार आणि चीनसोबतच्या व्यापारातील मक्तेदारी कोणत्या कायद्याने नष्ट झाली ?   (SET 2018 P2)

    अ) रेग्युलेटींग ॲक्ट 1773

    ब) पिटचा इंडिया ॲक्ट 1784

    क) चार्टर ॲक्ट 1813

    ड) चार्टर ॲक्ट 1833

  • ड) चार्टर ॲक्ट 1833





  • प्रश्न 18. बंगालच्या कोणत्या नबाबाने ढाक्याहून मुर्शिदाबादला राजधानी हलवली ? (SET 2018 P2)

    अ) मीर कासीम

    ब) सिराज उद्दौला

    क) मुर्शीद कुली खान

    ड) मीर जाफर

  • क) मुर्शीद कुली खान





  • प्रश्न 19. रामप्रसाद बिस्मील यांचे नाव कशाशी संबंधित आहे ?  (SET 2018 P2)

    अ) कानपुर कट खटला

    ब) अलीपूर कट खटला

    क) काकोरी कट खटला

    ड) मिरत कट खटला

  • क) काकोरी कट खटला





  • प्रश्न 20. कोणत्या जेल (तुरुंग) मध्ये जवाहरलाल नेहरूंनी 'डिसकव्हरी ऑफ इंडिया' नावाचा ग्रंथ लिहीला  ?  (SET 2018 P2)

    अ) पुणे जेल

    ब) अहमदनगर जेल

    क) आर्थर जेल

    ड) पाटणा जेल

  • ब) अहमदनगर जेल








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```