Skip to main content

SET/NET History 22 PYQ

SET/NET History 22

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. गदर पार्टीचे मुख्यालय कोठे होते ?  (SET 2017 P2)

अ) सॅन फ्रान्सिस्को

ब) पॅरिस

क) लंडन

ड) स्वित्झरलँड

  • अ) सॅन फ्रान्सिस्को






  • प्रश्न 2. रवींद्रनाथ टागोर यांनी आपले किताब नाईटहूड परत केले कारण होते :    (SET 2017 P2)

    अ) जालियनवाला बाग हत्याकांड

    ब) भगतसिंग यांना फाशी देणे

    क) चौरी - चौरा घटना

    ड) असहकार चळवळीच्या काळात केलेली दडपशाही

  • अ) जालियनवाला बाग हत्याकांड







  • प्रश्न 3. 'द रिलीजन ऑफ मॅन' हा ग्रंथ __________ यांनी लिहिले.  (SET 2017 P2)

    अ) राजा राम मोहन रॉय

    ब) भाऊ दाजी लाड

    क) रवींद्रनाथ टागोर

    ड) स्वामी दयानंद सरस्वती

  • क) रवींद्रनाथ टागोर







  • प्रश्न 4. परदेशात राहणाऱ्या कोणत्या भारतीय क्रांतिकाराने, जानेवारी 1905 मध्ये 'इंडियन सोशिओलॉजिस्ट' नावाचे नियतकालिक सुरु केले ?  (SET 2017 P2)

    अ) वि. दा. सावरकर

    ब) सरदार सिंगजी राणा

    क) श्यामजी कृष्ण वर्मा

    ड) लाला हरदयाळ

  • क) श्यामजी कृष्ण वर्मा






  • प्रश्न 5. खालीलपैकी कोणत्या शीख मिस्लचे रणजीत सिंह हे प्रतिनिधी होते ? (SET 2017 P2)

    अ) कन्हैया मिस्ल

    ब) सुकरचकीया मिस्ल

    क) अहलुवालिया मिस्ल

    ड) भंगी मिस्ल

  • ब) सुकरचकिया मिस्ल






  • प्रश्न 6. कोलकत्ता येथील सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये प्रस्थापीत झाले ?  (SET 2017 P2)

    अ) 1773 चा रेग्युलेटींग ॲक्ट

    ब) 1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट

    क) 1793 चा चार्टर ॲक्ट

    ड) 1813 चा चार्टर ॲक्ट

  • अ) 1773 चा रेग्युलेटींग ॲक्ट







  • प्रश्न 7. पुढीलपैकी कोणत्या वैज्ञानिकाला धार्मिक, छळचौकशीला सामोरे जावे लागले आणि वैज्ञानिक ग्रंथ छापण्यास मनाई केली गेली ?  (SET 2017 P2)

    अ) गॅलिलिओ

    ब) न्यूटन

    क) कोपर्निकस

    ड) रॉबर्ट बॉयल

  • अ) गॅलिलिओ





  • प्रश्न 8. लॅसे फेअर (मुक्तद्वार) धोरणाचा संबंध कशाशी आहे ?    (SET 2017 P2)

    अ) व्यापारवाद

    ब) मुक्त व्यापार

    क) मतदानाचे अधिकार

    ड) कुलाक

  • ब) मुक्त व्यापार







  • प्रश्न 9.  अमेरिकेत महामंदी कोणत्या वर्षी आली होती ?  (SET 2017 P2)

    अ) 1928

    ब) 1929

    क) 1930

    ड) 1931

  • ब) 1929







  • प्रश्न 10. चक्राकार इतिहासाच्या सिद्धांताचा प्रणेता असे कोणत्या सामाजिक विचारवंताला म्हटले जाते ? (SET 2017 P2)

    अ) ऑगस्ट कॉम्त

    ब) जॉर्ज विल्हेल्म एफ. हेगेल

    क) गियाम्बातिस्ता व्हीको

    ड) कार्ल मार्क्स

  • क) गियाम्बातिस्ता व्हीको
  • चक्राकार इतिहासाच्या सिद्धांताचा प्रणेता (father of cyclical view of history)






  • प्रश्न 11. 'माय मेमरीज ऑफ आय. एन. ए. अँड इट्स नेताजी' (माझ्या आझाद हिंद सेनेच्या आठवणी आणि त्याचे नेताजी) हे पुस्तक कोणी लिहिले ?  (SET 2018 P2)

    अ) रासबिहारी बोस

    ब) शाहनवाझ खान

    क) कॅ. आमरीक सिंग

    ड) मेजर सुरज मुल

  • ब) शाहनवाझ खान







  • प्रश्न 12. 'बालविवाह आणि असंमत वैधव्य यासंबंधीची टिपणी' या 1884 मध्ये प्रकशित आणि वितरण झालेल्या लेखनाचे लेखक कोण होते ? (SET 2018 P2)

    अ) टि. माधव राव

    ब) म. गो. रानडे

    क) बेहरामजी एम. मलबारी

    ड) बिपीनचंद्र पाल

  • क) बेहरामजी एम. मलबारी







  • प्रश्न 13. 1875 मध्ये स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली ? (SET 2018 P2)

    अ) अहमदाबाद

    ब) अमृतसर

    क) हिस्सार

    ड) मुंबई (बॉम्बे)

  • ड) मुंबई (बॉम्बे)






  • प्रश्न 14. तुहफत - अल - मुवाहिदीन या प्रसिद्ध रचनेचे लेखक कोण होते ?   (SET 2018 P2)

    अ) राधाकांत देब

    ब) राजा राम मोहन रॉय

    क) सर सय्यद अहमद खान

    ड) ईश्वरचंद्र विद्यासागर

  • ब) राजा राम मोहन रॉय






  • प्रश्न 15. भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कधी झाली ? (SET 2018 P2)

    अ) 1886

    ब) 1889

    क) 1887

    ड) 1891

  • क) 1887





  • प्रश्न 16. भारत चीन युद्धाच्या वेळेस भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?  (SET 2018 P2)

    अ) पी. एन. थापर

    ब) बी. एम. कौल

    क) व्ही. के. कृष्णमेनन

    ड) बाबू जगजीवन राम

  • क) व्ही. के. कृष्णमेनन





  • प्रश्न 17. 'ऑपरेशन विजय' कशाशी संबंधित आहे ?  (SET 2018 P2)

    अ) भारत - चीन संघर्ष

    ब) भारत - पाकिस्तान संघर्ष

    क) गोवा विलीनीकरण

    ड) अन्नधान्य तुटवडा प्रश्न

  • ब) भारत - पाकिस्तान संघर्ष





  • प्रश्न 18. ब्लॅक डेथ म्हणजे ___________ शतकात युरोपातील लक्षावधी लोकांचे बळी घेणारी प्लेगची साथ होती.  (SET 2018 P2)

    अ) तेराव्या

    ब) चौदाव्या

    क) पंधराव्या

    ड) सोळाव्या

  • ब) चौदाव्या





  • प्रश्न 19. 'अपारथेड' (Apartheid) कशाशी संबंधित आहे ?  (SET 2018 P2)

    अ) लिंग संबंध भेदभाव

    ब) ग्रामीण - शहरी भेदभाव

    क) वंश भेदभाव

    ड) धार्मिक भेदभाव

  • क) वंश भेदभाव





  • प्रश्न 20. शीत युद्ध काळातील अमेरिका व रशियामधील पहिली सत्ता संघर्षाची घटना कोणती ?  (SET 2018 P2)

    अ) कोरियन प्रश्न

    ब) बर्लिनची नाकेबंदी

    क) पोलिश समस्या

    ड) क्युबन क्षेपणास्त्र समस्या

  • ब) बर्लिनची नाकेबंदी








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 




    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```